Take a fresh look at your lifestyle.

Jhund Movie: नागराजच्या ‘हलगीनं’ पुणेकरांना नाचवलं…

गेल्या काही दिवसांपासून झुंडने अनेकांची उत्सुकता वाढवली होती.

0

Jhund Movie: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. त्याला मोठया प्रमाणवर चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आज नागराजच्या झुंडचा प्रिमिअर (Bollywood News)पुण्यातील कोथरुडमधील सिटीप्राईड थिएटरमध्ये (Pune Citipride) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिथं त्यानं ज्यापद्धतीनं झुंडचं प्रमोशन केलं त्याचे व्हिडिओ सोशल मीडिय़ावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. त्याला उपस्थित प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. केवळ नागराजच नाहीतर अजय अतुलनं देखील यावेळी हजेरी लावली होती. सैराट फेम आकाश ठोसर, रिंकु राजगुरु यांच्या हटके लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (Bollywood News)

Leave A Reply

Your email address will not be published.