Take a fresh look at your lifestyle.

कल्याणमध्ये पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस कॉन्स्टेबलची हत्या; पोलीसही चक्रावले

पोलिसांनी आरोपी पत्नी आणि मुलीला ठोकल्या बेड्या

0

पत्नी आणि मुलीनेच खलबत्याने ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने हत्या केली. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नी आणि मुलीला अटक केली आहे.

कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात पत्नी ज्योती बोरसे व मुलगी भाग्यश्री बोरसे यांच्यासोबत राहत होते. तीन वर्षापूर्वी मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले होते. पण घरगुती वादामुळे ती माहेरी आली होती. मुलगी पतीबरोबर नांदत नसल्याने प्रकाश यांचा पत्नी आणि मुलीसोबत सतत वाद होत होता. गुरुवारी रात्री देखील त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून पत्नी आणि मुलीने त्यांच्या डोक्यात खलबता मारत डोके ठेचून हत्या केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पत्नी आणि मुलीला अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरु आहे.


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.