Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलवर दहशतवादाचे सावट; एटीएसने दिला इशारा

आयपीएलवर दहशतवादाचे सावट; एटीएसने दिला इशारा

0

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होणार आहे. मात्र दहशतवादी विरोधी पथकाने आयपीएल खेळवण्यात येणारी ठिकाणे आणि खेळाडूंची हॉटेल्स ही दहशतवाद्यांच्या रडावर असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील आयपीएल व्हेन्यू आणि खेळाडूंच्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

एटीएसने काही दिवसांपूर्वी एका दहशतवाद्याला अटक केली होती. या दहशतवाद्याने आयपीएलचे सामने होणाऱ्या ठिकाणांची आणि खेळाडू राहणार असलेल्या हॉटेल्स बाहेरची रेकी केली होती. मुंबई पोलिसांच्या अंतर्गत सर्क्युलरमध्ये एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्याने वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन पाईंट या मार्गावर रेकी केली होती. या अहवालाची कॉपी द फ्री प्रेस जर्नलच्या हाती लागली आहे.

एटीएसच्या चौकशीत आयपीएलवर दहशतवादाचे सावट असल्याचे उघड झाल्यानंतर स्टेडियम आणि खेळाडूंची हॉटेल्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्या मार्गावरून खेळाडू प्रवास करणार आहेत त्या मार्गावर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. आता खेळाडूंबरोबरच सामना अधिकारी आणि अंपायर यांना देखील अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. याचबरोबर खेळाडूंचे हॉटेल ते स्टेडियम या मार्गावर पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.