Take a fresh look at your lifestyle.

झेडपीएफएमएस वेतन प्रणाली जलद गतीने कार्यान्वित होण्याकरिता प्रहार शिक्षक संघटना धडकली थेट जिल्हा उपकोषागार कार्यालयात

शिक्षकांचे वेतन दरमहा झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे विनाविलंब अदा करण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

0

बुलडाणा : 
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन माहे जुलै पासुन प्रथमतः झेडपीएफएसएस संगणकीय वेतन प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असुन जिल्हयातील शिक्षकांचे वेतन संगणकीय प्रणालीद्वारे विनाविलंब अदा करण्यात यावे ही प्रमुख मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे,सदर मागणीमुळे जिल्हयातील शिक्षकांचे वेतन विनाविलंब होण्याचा मार्ग प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सुकर झालेला आहे.

जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,जिल्हा सरचिटणीस देवीदास बडगे,संग्रामपुरचे तालुकाध्यक्ष संतोष घिवे यांच्यासह बहुसंख्येने जिल्हा पदाधिकारी यांनी थेट जिल्हा उपकोषागारात धडकले व सदर संगणकीय वेतन प्रणाली संदर्भात चर्चा केली.
याप्रसंगी सदर झेडपीएफएमएस संगणकीय प्रणालीद्वारे दरमहा शिक्षकांचे वेतन विनाविलंब थेट शिक्षकांच्या बॅक खात्यात पाठविण्यात येतील असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले तसेच माहे जुलैच्या देयकाची संपुर्ण वेतन प्रक्रिया पार पाडण्यात आलेली असुन शक्य तितक्या लवकर झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यात येणार आहेत असे याप्रसंगी उपकोषागार कार्यालयातील संबंधित अधिकारी यांनी सांगितले.

जिल्हा उपकोषागार कार्यालयातील संबधित अधिकारी ऋषीकेश वाघमारे यांचा याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.