Take a fresh look at your lifestyle.

दिलीप बळी व राधेश्याम शेगोकार सेट परीक्षा उत्तीर्ण

दिलीप बळी व राधेश्याम शेगोकार सेट परीक्षा उत्तीर्ण

0

शेगांव : 
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा येथे कार्यरत असलेले सहाय्यक अध्यापक व प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी व जि.प.प्राथमिक कन्या शाळा पिंपळगाव राजा येथील राधेश्याम शेगोकार यांनी सेट परिक्षा उत्तीर्ण केली आहे. २६ मार्च रोजी घेण्यात आलेल्या या परिक्षेचा निकाल २७ जून रोजी लागलेला असुन येथील दिलीप बळी व राधेश्याम शेगोकार या शिक्षकांनी यश संपादन करून बाजी मारलेली आहे,त्यांच्या यशाबद्दल संपुर्ण शिक्षण क्षेत्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील काठिण्य पातळीची परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल शिक्षक दिलीप बळी व राधेश्याम शेगोकार यांचा प्रहार शिक्षक संघटना,कास्ट्राईब शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षक संघ,पदविधर शिक्षक संघटनेच्यावतीने प्रमुख अतिथी असलेले गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष बी.डी.धुरंधर,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे बी.डी.पाटील,पदविधर शिक्षक संघटनेचे एन.के.देशमुख व विविध संघटनेचे पदाधिकारी राजेद्र सुरवाडे,अरूण सावंग,साहेबराव सोळंके,विजय गावंडे,राजु इंगळे,प्रशांत नागे,गजानन जाधव,निरंजन वाकोडे,सुनिल देशमुख,विजय टापरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिलीप बळी यांचा सत्कार करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट व शिक्षकवृंद

Leave A Reply

Your email address will not be published.