Take a fresh look at your lifestyle.

RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

0

RRR Movie: ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होते तो आरआरआर हा नुकताच प्रदर्शित झाला. टॉलीवूडच्या या अॅक्शनपटानं बघता (Entertainment News) बघता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद त्यानंतर रिलिज झालेलं गाणं, नाटो नाटो गाण्यातून (Tollywood News) ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांचा डान्स हे सारं प्रेक्षकांना कमालीचं भावलं होतं. त्यामुळे त्याची चर्चाही होते. तीनवेळा या चित्रपटाला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. कोविडचा फटका बसला. आता या चित्रपटाला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स या (The Kashmir Files) चित्रपटाला सामना करावा लागणार असं बोललं जात होतं. मात्र आरआरआरचा रुबाबच वेगळा आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये खेचून आणलं आहे. त्यात बाहुबलीच्या दिग्दर्शकाचा नवा चित्रपट म्हणून RRR प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरला आहे.

राजामौली (S S Rajamauli) यांचे चित्रपट पाहायला जाताना काही गोष्टी डोक्यातून बाहेर काढून ठेवाव्या लागतात. तर त्यांच्या चित्रपटाचा आनंद घेता येतो. म्हणजे टिपिकल लॉजिकल प्रश्न घेऊन तुम्ही त्यांच्या चित्रपटाला जोखण्याचं काम केलं की फसलात म्हणून समजा. जवळपास पाचशे कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या RRR चं कामचं भव्य आहे. सेट, लोकेशन, व्हिएफएक्स, वेशभूषा, कलाकार, स्थानिक कलाकार हे जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा थक्क व्हायला होतं. मुळातचं RRR हा थिएटरवर अनुभवण्याचा विषय आहे. तो जर तुम्ही टीव्ही, मोबाईलवर पाहणार असाल तर मजाच नाही. RRR चा आवाज कमाल आहे. त्याचं संगीत, तो थरार, संवाद हे सांर काही थिएटरमध्येच आपण प्रभावीपणे अनुभवू शकतो. त्यासाठी RRR ला तोड नाही. रामचरण, ज्युनि. एनटीआर यांनी कमालीची मेहनत घेतली आहे. ती ठायीठायी दिसते.

RRR जेव्हा सुरु होतो तेव्हा नकळत आपण त्याचाच एक भाग होऊन जातो. हा चित्रपट एक वेगळ्याच प्रकारचा माहौल तयार करतो. त्यामुळे तीन तासांच्या या थरारपटात तुम्ही कुठेही रेंगाळत नाही. डबिंगच्या बाबत जरा तक्रार आहे. बाहुबलीचं जेवढं ताकदीचं डबिंग होतं तेवढं RRR चे नाही हे सांगावं लागेल, त्यामुळे ते थोडसं खटकतं. ब्रिटीशकालीन भारतामध्ये ब्रिटिशांनी कशाप्रकारे अन्याय, अत्याचार केला समाजातील गरीब समुहाला आपल्या फायद्यासाठी धारेवर धरलं. त्यांचा अमानुष छळ केला. हे सारं RRR मध्ये आपण पाहतो. वरवर पाहता स्टोरी आपल्याला ऐकल्यासारखी, वाचल्यासारखी वाटेल. मात्र ती ज्याप्रकारे पडद्यावर साकारण्यात आली आहे ते कमाल आहे. त्यामुळे RRR च्या वाटयाला गेात तर शंभर टक्के मनोरंजन होणार हे पक्कं लक्षात ठेवावं.

Leave A Reply

Your email address will not be published.