Take a fresh look at your lifestyle.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबीत पदोन्नती प्रक्रियेची अंमलबजावणी तात्काळ करावी – महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष

जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबीत पदोन्नती प्रक्रियेची अंमलबजावणी तात्काळ करावी

0

बुलडाणा
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी केलेली असुन शिक्षकांना विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक,पदविधर शिक्षक,विषय शिक्षकांना (रिव्हर्शन) मुळ पदावर आणणे व विषय शिक्षक पदोन्नती संदर्भातील प्रक्रिया अद्यापपर्यंत प्रलंबीत आहेत.
प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने पदोन्नती संदर्भात अनेक वेळा लेखी निवेदने देऊन प्रत्यक्ष चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे.परंतु शिक्षकांच्या बदली प्रक्रियेची सबब सांगून सदर पदोन्नती संदर्भातील विषय दुर्लक्षित करण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत बहुतांश शिक्षकांच्या बदली प्रक्रिया पार पाडण्यात येऊन पूर्णत्वास आलेली आहे. बुलडाणा लगत असलेल्या जिल्हा परिषद जळगाव खान्देश येथे शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे,त्यानुसार बुलडाणा जिल्हयातील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पार पाडण्यात यावी या विषयासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या सोबत दि.२८ मार्च रोजी चर्चा करण्यात येणार असून सदर विषयासंदर्भातील चर्चा सकारत्मक न झाल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आलेला आहे.

अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदासंदर्भातील पदोन्नतीची प्रक्रिया अद्यापपर्यंत पुर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे तात्काळ पदोन्नतीने भरण्यात यावीत.
– महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष
प्रहार शिक्षक संघटना बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.