मातंग समाज मेळाव्याला उपस्थित रहा : दिलीप राठोड ,उध्दव नागरे लोणार प्रतिनिधी
मातंग समाज मेळाव्याला उपस्थित रहा : दिलीप राठोड ,उध्दव नागरे लोणार प्रतिनिधी
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा येथे होऊ घातलेल्या मातंग मेळाव्याला दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी गर्दे हॉल येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड तसेच भाई महेंद्र पनाड यांनी केले आहे.
लोणार तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात राहत असल्याकारणाने इथल्या सर्वच राजकीय पक्षांनी व समाज व्यवस्थेने मातंग समाजाला नेहमीच सत्तेपासून वंचित ठेवले आहे त्यामुळे मातंग समाजाचा आर्थिक विकास झाला नाही या सर्वांनी मिळून मातंग समाजाला मानसिक गुलाम बनवून ठेवले आहे त्यामुळे हा समाज चांगली परिस्थिती असूनही पंगू बनवून ठेवला आहे हे शल्य अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना नेहमीच बोचते आहे.

मोकळा राजकीय श्वास घेण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 13- 10 -2022 ला बुलढाणा येथील गर्दे हॉलमध्ये भव्य मातंग समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन भाई महेंद्र पनाड व वंचित तालुकाध्यक्ष दिलीप राठोड महासचिव बळी मोरे यांनी केले आहे