Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमध्ये घरांच्या किंमती वाढणार; CREDAIचा निर्णय

नाशिक : कोरोनाचा सर्वांना फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

0

नाशिक : कोरोनाचा सर्वांना फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यासोबत आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती या सर्वांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रशिया युक्रेन युद्धाचाही (Russia-Ukraine War) परिणाम या वाढत्या किमतींवर होत असल्याने घरांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय क्रेडाईने (CREDAI) घेतला आहे.

डाईने केलेल्या सर्वेक्षणात बांधकाम व्यवसायात बांधकाम साहित्य, मजुरी यांसह रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक गोष्टींच्या किमती वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या महागाईचा फटका घर घेणाऱ्यांना देखील बसणार आहे. नाशिक शहरात 500- 800 रुपये प्रतिचौरस फूट दराने घरांच्या किमती वाढविण्याचा निर्णय क्रेडाईने घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.