Take a fresh look at your lifestyle.

संत नगरीमध्ये सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

संत नगरीमध्ये सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

0

शेगांव: 
स्थानिक रोकडिया नगर येथील मथुरा लाॅन येथे संत शिरोमणी जगद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम जगद्गुरु सेवालाल महाराज आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग लावण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजातील जेष्ठ व्यक्ती मोहन चव्हाण तसेच प्रमुख अतिथी धनराज चव्हाण,पी.डी.राठोड,इंदल चव्हाण तसेच बंजारा समाजाचे नायक विजय चव्हाण,वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद राठोड,वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य व परिसरातील गोर बंजारा समाजातील महिला व पुरुष या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. मोहन चव्हाण, धनराज चव्हाण,विजय चव्हाण यांनी समाज बांधवांना याप्रसंगी मार्गदर्शन केले तसेच विनोद राठोड व श्रावणी राठोड यांनी सेवालाल महाराजांच्या गायनांमधून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड यांनी केले, बंजारा समाजातील स्त्रियांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजाचे लेंगी नृत्य सादर केले. त्याचबरोबर पुरुष मंडळींनी सुद्धा आपले लेंगी नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले, मिळाले,कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.

जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करतांना बंजारा समाज बांधव

Leave A Reply

Your email address will not be published.