Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा

0

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यासाठी (Pune Tour) पुणे पोलिस दलाचीही (Police Force) संपुर्ण तयारी झाली असून रविवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलिस दल, फोर्सवनच्या कंपन्यांसह शहर पोलिस दलातील तब्बल 2200 पोलिस बंदोबस्तावर असणार असून पोलिसांकडून मागील तीन दिवसांपासून कार्यक्रम, सभेसह विविध ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पुणे मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. त्याचदिवशी महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर विविध प्रकारच्या विकासकामांचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी हे रविवारी सकाळी 10 वाजता विमानाने लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावर येतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने शिवाजीनगर येथे सिंचन नगरच्या मैदानावर व तेथून वाहनाने रस्तामार्गे महापालिका भवनात जाणार आहेत. त्यानंतर ते डेक्कन येथील गरवारे मेट्रो स्थानकावर जाणार आहे. तेथून मेट्रोने आनंदनगर, एमआयटी येथे सभा आणि त्यानंतल लवळे येथे जाणार आहेत.

शहरातील मेट्रो प्रकल्पासह विविध कार्यक्रमांचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांच्या रविवारच्या पुणे दौऱ्यामध्ये होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे रविवारी सकाळी दहा वाजता लोहगाव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते शिवाजीनगर सिंचननगर मैदानावर हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत. तेथून पुणेवाहनातुन गरवारे महाविद्यालय येथे येतील. तेथून ते मेट्रोने आनंदनगर येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. एमआयटी येथील सभेनंतर ते लवळे येथे जाणार आहेत. अशा पद्धतीने पंतप्रधानांचा दौरा असून त्यासाठी पुणे, ग्रामीण पोलिसांही बंदोबस्त तयार ठेवला आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तावर राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांचे खास लक्ष असून त्यांच्याकडून बंदोबस्ताचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडून बंदोबस्ताचे काम पाहीले जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी, तीन पोलिस उपायुक्त, 16 सहायक पोलिस उपायुक्त हे पुणे पोलिसांच्या मदतीसाठी देण्यात आले आहेत. याबरोबरच राज्य राखीव पोलिस दल, फोर्सवनच्या अशा तीन कंपन्या, शहर पोलिस व खास मागविण्यात आलेले पोलिस असा 2200 पोलिसांचा बंदोबस्त दौऱ्यासाठी नेमण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक शाखेनेही पंतप्रधानांच्या रस्ते मार्गावरील प्रवासात कुठलीही अडचण राहू नये, यादृष्टीने नियोजन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.