Take a fresh look at your lifestyle.

“सर्वसामान्य वापरत असलेल्या लहान कारमध्येही सहा एअरबॅग्स द्या”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कार उत्पादक कंपन्यांना आवाहन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केली आहे.

0

देशात रस्ते अपघातांचं प्रमाण सर्वाधिक आहे. याला खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे तसेच गाडीत सुरक्षेचे फिचर्स कमी असल्याने मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं आहे. भारतातील वाहनं अधिक सुरक्षित बनवण्याचा त्यांचा विचार आहे. म्हणून सर्व चारचाकी वाहनांसाठी दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीनंतर आता सर्व कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार करत आहेत. एअरबॅग्स मृतांची संख्या कमी करण्यासाठी मोठी भूमिका बजावतात.

“लहान कार, ज्या बहुतांश निम्न मध्यमवर्गीय लोकांकडून विकत घेतल्या जातात, त्यातही पुरेशा संख्येने एअरबॅग असाव्यात. ऑटोमेकर्स फक्त श्रीमंत लोकांनी खरेदी केलेल्या मोठ्या आणि महागड्या कारमध्येच आठ एअरबॅग का देतात?, याचे मला आश्चर्य वाटत आहे.”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअर बॅग्स लावल्या तर किंमत फक्त ८ ते ९ हजारांनी वाढेल. एअर बॅग्सची किंमत १८०० रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दरही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्स दिल्यास गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढेल.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, नितीन गडकरी यांनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत त्यांचे मत ट्विटरवर शेअर केले होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सर्व खासगी वाहन उत्पादकांना सर्व प्रकारांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्यपणे प्रदान करण्याचे आवाहन केले होते. हे पाऊल ग्लोबल NCAP च्या ‘सेफर कार्स फॉर इंडिया’ मोहिमेलाही अनुकूल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.